जोगिया
गदिमांच्या प्रतिभेचा एक विलक्षण मनोरम आविष्कार म्हणजे ‘जोगिया’ ही कविता -
याच जोगिया नावाने त्यांचा पहिला काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला. प्रस्तावनेत ते म्हणतात की व्यवसाय म्हणून लेखणीशी बरेचदा प्रतारणा किंवा बेईमानी झाली असेल पण ही कविता मात्र व्रतस्थ राहून केलेली काव्यनिर्मिती आहे...
गदिमांची माफी मागून जोगिया वर सुचलेल्या चार ओळी
जोगियाने उघडल्या
जखमांच्या जुन्या व्यथा
क्षणभंगुर आयुष्याच्या
विलक्षण या वाटा
दाहक वेदनांचे
प्रखर उद्गार प्रकटले
तुझ्या हुदक्यांतून
माझे गीत उमटले
सांत्वना नको आता
आता फक्त सावरणं
तुझं माझं आता
फक्त एकमेकांसाठी जगणं
खुळ्या प्रीतीत आपल्या
होऊन जाऊ दंग
जोगिया आता रोज
भरेल त्यात रंग
....©राहुल लाळे

Comments
Post a Comment