झोडणाऱ्या सरीत
चिंब भिजायचं

बरसणाऱ्या पावसात
न्हाऊन जायचं

स्वप्नात उमललेली फुलं
प्रत्यक्षात फुलवायची

दूर जाणारे ढग
विसरुन जायचे

झिरपणारे क्षण
टिपत रहायचे

मनाच्या ओलाव्यात
आठवणी जपायच्या

जीवलगांच्या साथीत मग
आशा बहरतील

अळवावरचं पाणी वाहून जाईल
मायेचं माणूस साथीला राहील

राहुल

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका