स्वप्न फुलांनो....

स्वप्न फुलांनो माझ्यासंगे
सतत तुम्ही बहरत रहा

जीवन तुमचे जरी क्षणभर
उभारी देता  तुम्ही जीवनभर

सोनेरी क्षितिजे सजवीत रहा
उमेद मनाला तुम्ही देत रहा

बेभान मी,  स्वच्छंदी तुम्ही
शब्दविहार करु जन्मोजन्मी

स्वप्न फुलांनो माझ्या संगे
सतत तुम्ही बहरत रहा

माझ्या सवे तुम्ही ही माझ्या
आप्तजनांना रिझवत रहा

राहुल लाळे
१६-५-२०१९

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका