दिसरात





दिसरात

संध्येचे ते कितीसं आयुष्य
मनोहारी  तरी  किती हे दृष्य

 भांगात ती सूर्यबिंब मिरविते
सौभाग्याचा जणू मळवट भरते

संध्याछाया धुंद रंग उधळते
दाहक दुःखे क्षितिजात लपवते

मावळतीची उन्हं विरताना
निशा आशेचे  स्वप्न रंगवते

उत्साहाचे रंग  लेऊन उषा मग मिरवत येते
विश्वातली नक्षत्रे दिवस फुलवते
आकाशातली फुले रात्र खुलवते
दिसरातीचे नित्यनेम चालूच रहाते

राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका