नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. राहुल लाळे गिरनार - सोमनाथ - द्वारका * दिवस पहिला* १ - २ नोव्हेंबर एखाद्या गोष्टीची ओढ लागणं म्हणजे काय ते ती ज्याला लागते , त्यालाच कळते. शाळेत असताना मधल्या सुट्टीची - शाळा सुटल्यावर घरी जायची- अभ्यास संपल्यावर खेळायला जायची -परिक्षा संपल्यावर मे महिन्याच्या - दिवाळीच्या सुट्टीची ओढ असायची. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारची ओढ प्रत्येकाला लागतेच. आईला दूर असलेल्या मुलांच्या भेटीची , प्रियकराला प्रियेची , मित्रांना स्नेहसंमेलनाची , गरीबांना न्याय , समता - विकासाची , समृद्धीची. आषाढ आली की वारकऱ्यांना वारीची.. भक्तांना आपापल्या श्रध्दास्थानांची... अशी ओढंच माणसाला जगायचा मार्ग दाखवते..नवी उर्जा देते. अशीच उर्जा मिळवण्यासाठी अनेक ठिकाणं पहाण्याची , अ नेक उपक्रमात सहभागी होण्याची मला आवड लागली असावी. त्यामुळे सुट्टी काढून बाहेर छोट्या मोठ्या पर्यटनाला जाणं नेहमीचंच. गेली काही वर्षं चैत्री पाडवा आला की उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा , आषाढ आला की वारी , गुरुपौर्णिमा आली किंवा ...
राहुल , इतकं सहज , सोप्या शब्दात आणि इतका खोल अर्थ असलेलं कसं काय लिहितोस तू ? खरोखर तू शीघ्र कवी आहेस
ReplyDeleteआपल्यासारखे मैत्रजनाच्या आसपास असण्याचा परिणाम?
Delete